तुलसी पत्र ( Ocimum sanctum)
संस्कृत नाव- तुलसी, विष्णु प्रिया, भूतघ्नी
मराठी नाव- तुळस
हिंदी नाव- तुलसी
संपूर्ण भारतात आढळणारे शाखा-प्रशाखा युक्त क्षुप.
आयुर्वेदानुसार तुळस तिखट, कडु व उष्ण आहे.
तुळशीचे औषधी उपयोग व तिचे गुणधर्म व तिचा महिमा सर्व श्रुत आहे.
तरी थोडक्यात तिचे गुणधर्म पाहू-
तुळस कफवात शामक, जन्तुघ्न, वेदनाहर, शोथहर, त्वचेच्या दोषांचे निवारण करणारी आहे.
तुळस कास-श्वास हर(खोकला व दम कमी करणारी) व क्षयनाशक आहे. यासाठी तुळशीचा रस खडीसाखर घालून द्यावा.
सर्दीवर 7-8 तुळशीची पाने व 2/3 काळी मिरी घालून काढा करून प्यावा.लगेच बरे वाटते.
तुळशीच्या रसाने किंवा तुळशीची पाने चावून खाल्ल्यास भूक वाढते, पचन सुधारते.
तुळस कृमिघ्न आहे. तसेच ती विषघ्न ही आहे.
तुळशीच्या पानांचा रस हृदयासाठी हीतकर आहे.
तुळस रक्त शोधक आहे.
तुळशीच्या बिया बल वाढवणार्या, पित्त शामक व मुत्राचे प्रमाण वाढवणार्या आहेत.
अर्धशिशी व इतर शिरोवेदनेत तुळशीच्या रसाने नस्य करावे.
त्वचेच्या विकारांवर, तुळशीच्या पानांचा रस चोळून लावावा.
मंत्र - ॐ गजकर्णाय नमः। तुलसी पत्रं समर्पयामि ।।

करवीर पत्र (Nerium indicum)
संस्कृत नाव- करवीर, अश्वमारक
मराठी नाव- कण्हेर
हिंदी नाव- कनेर
अल्प मात्रेत कण्हेर हॄदयवर हृद्य ( हृदयाला बल देणारे ) आहे. पण अधिक मात्रेत हृदय अवसादक आहे म्हणून याचा वापर तज्ञांच्या देखरेखीखालीच करावा.
प्रायः काश्मिर, नेपाळ सारख्या उंच डोंगराळ प्रदेशात आढळणारा सदाहरीत गुल्म. पण हल्ली संपूर्ण भारतात आढळते . फुले सुगंधित श्वेत किंवा लाल रंगाची असतात. फळ लांब चपटी असतात. त्यात अनेक भुऱ्या रंगाच्या बिया असतात. याचे श्वेत व रक्त असे २ प्रकार असतात.
आयुर्वेदोक्त औषधी उपयोग :
कण्हेर ही विषारी वनस्पती आहे. हिचा उपयोग तज्ञांच्या सल्ल्याने व त्यांच्या देखरेखी खालीच करावा.
आयुर्वेदातील अनेक औषधां मध्ये कण्हेरीचा वापर शुद्धीकरणा नंतर केला जातो. जसे करवीराद्य तेल , करवीर योग, महविषगर्भ तेल.
कण्हेर कडू , तिखट, उष्ण वीर्याचे व कफ वात शामक आहे.

वात विकारात व वेदनेत या तेलाने मालिश करतात.
अल्प मात्रेत कण्हेर हॄदयवर हृद्य ( हृदयाला बल देणारे ) आहे. पण अधिक मात्रेत हृदय अवसादक आहे म्हणून याचा वापर तज्ञांच्या देखरेखीखालीच करावा.
ॐ विकटाय नमः । करवीर पत्रं समर्पयामि ।।
No comments:
Post a Comment