शमी पत्र (Propsopis cineraria)
संस्कृत नाव- शमी, तुंगा , केशहंत्री ( केसांचा नाश करणारे )
मराठी नाव- शमी
हिंदी नाव- छोंकर
शुष्क प्रदेशात आढळणारे (गुजरात, राजस्थान ) मध्यम उंचीचा, कंटकीत वृक्ष.
शमी तुरट, मधुर रसाचे व शीत गुणधर्माचे आहे. शमी कफ-पित्ताचे शमन करते.
याची साल विषघ्न आहे.
शमीचे फल केश नाशक आहे.
हे बुद्धी वर्धक असल्याने स्मरण शक्ति वाढवण्यासाठी व मस्तिष्क दौर्बल्यामध्ये याचा वापर करतात.
शमीची पाने रुक्ष, तुरट असून रक्तस्राव थांबवण्यासाठी व अतिसारामध्ये याचा वापर करतात.
तज्ञांच्या सल्ल्यानेच याचाही वापर करावा.
मंत्र - ॐ वक्रतुण्डाय नमः। शमी पत्रं समर्पयामि ।।
अपामार्ग (Achyranthus n)
संस्कृत नाव- अपामार्ग , शिखरी
मराठी नाव- आघाडा
हिंदी नाव- चिडचिडी
संपूर्ण भारतात आढळणारे १ ते ३ फूट उंचीचे शाखा-प्रशाखा युक्त क्षुप. याची फुले मंजिरीत साधारणपणे १ फूट लांब, अधोमुख असतात. म्हणून याचे एका पर्यायी नाव प्रत्यक्पुष्पा आहे. याच्या फळामध्ये तांदळांप्रमाणे दाणे असतात. त्यांना "अपामार्ग तंडूल" म्हणतात. याचे श्वेत व रक्त असे दोन प्रकार असतात.
आयुर्वेदानुसार अपामार्ग तिखट, कडु, गुणधर्माने उष्ण आहे व कफ वात शामक आहे.
ऋषी पंचमीच्या दिवशी याचा उपयोग स्नान करण्यासाठी व तोंड धुण्यासाठी केला जातो. खरोखरच दातदुखीवर याचा उपयोग होतो.
सुज व वेदना असताना याचा लेप करतात.
कान दुखत असल्यास अपामार्ग सिद्ध तेल कानात घालतात.
वृश्चिक दंशावर याच्या मुळाचा लेप त्या ठिकाणी लावल्यास वेदना कमी होते. तसेच मुळ पाण्यात उकळून पिण्यास द्यावे. त्वचेच्या विकारांवर (खरूज , नायटा) याच्या मुळाचा लेप लावतात.
अपामार्ग अग्निवर्धक, पाचक पित्तसारक व कृमिघ्न आहे. याचे बिजा मात्र पचायला जड व मालावष्टम्भक आहे.
आघाड्या पासून बनवलेले औषध " अपामार्ग क्षार " याचा उपयोग खोकला , दमा यावर होतो.
अपामार्ग क्षार मुत्राचे प्रामाणही वाधवतो. म्हणून किडनी स्टोन मध्ये इतर औषधां बरोबर याचा वापर करतात. पण याचा उपयोग तज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.
मंत्र - ॐ गुहाग्रजाय नमः। अपामार्ग पत्रं समर्पयामि ।।

No comments:
Post a Comment