Friday, September 25, 2015

२१ पत्री व त्यांचे औषधी गुणधर्म - अर्जुन पत्र, विष्णूक्रान्त पत्र

अर्जुन पत्र  (Terminalia arjuna)

संस्कृत नाव- अर्जुन, धवल (बाह्य त्वक श्वेत असल्यामुळे )
मराठी नाव- अर्जुन सादडा 
हिंदी नाव- अर्जुन, कहुआ 

शुष्क डोंगराळ प्रदेशात, प्रामुख्याने नदीकिनारी आढळणारा ५० ते ६० फूट उंच वृक्ष.  याचे खोड  उंच सरळ,  बाहेरुन सफेद व आतून रक्त वर्णाचे असते. अर्जुन छालीचाच उपयोग औषधा करीता होतो. 

अर्जुन छालीचा हृदय विकारावारील उपयोग सर्वश्रुत  व प्रसिद्ध आहे. 

आयुर्वेदोक्त औषधी उपयोग :

आयुर्वेदानुसार अर्जुन कषाय (तुरट )  रसाचा,  गुणधार्माने शीत   आहे व प्रभावाने हृद्य आहे. हृदयाच्या मांस  पेशींचे बल वाढवून त्याचे कार्य सुधारण्याचे काम अर्जुनामुळे होते. अर्जुनामुळे हृदय सशक्त,  उत्तेजित होउन हृत्स्पंदन सुधारते. अनेक संशोधनाद्वारे अर्जुनाच्या या गुणधर्मांवर शिक्कामोर्तब झाले आहे. 
अर्जुन छालीने  हृत्शूल (angina pain ) कमी होउन हृदयाचे   कार्य   सुधारते. 
अर्जुन सुज कमी करणारे व anti-oxidant आहे 
अर्जुन रक्तातली चरबी ( cholesterol) कमी करण्याचे काम करते. यासाठी रोज अर्जुन क्षीरपाक घ्यावा.
अर्जुन क्षीरपाक बनवण्याची कृती-
2 ग्रॅम अर्जुन छाल चूर्णं, 1कप दूध व 1/4 कप पाणी घालून दूध शिल्लक राही पर्यंत उककळावे. व थोडी खडी साखर घालून सकाळी नाश्त्यानंतर घ्यावे.
या व्यतिरीक्त रक्त स्राव थांबवण्यास अर्जुन साली चा उपयोग होतो.
हाडं सान्धणारी वनस्पती म्हणून अर्जुन प्रसिद्ध आहे. याची सला पोटात घ्यावी व वरून साल बांधावी.
प्रमेह, मधुमेह व सदाह मुत्र प्रवृती वर ही अर्जुन उपयुक्त आहे.

मंत्र- ॐ  गजदन्ताय नमः। अर्जुन पत्रं समर्पयामि ।।

विष्णुक्रान्त पत्र (Evolvulus alsinoides )

संस्कृत नाव- विष्णूक्रान्त
मराठी नाव- विष्णू क्रान्ता, शंखावली
हिंदी नाव- विष्णूक्रान्ता
डोंगराळ खडकाळ प्रदेशात पावसात उगवणारी वनस्पती.
विष्णूक्रान्ता मेध्य म्हणजे बुद्धी वर्धक आहे.  तसेच  विष्णूक्रान्ताचा संस्थेवर  शामक कार्य होते. त्यामुळे अनिद्रा, नैराश्य वर उपयुक्त.
ज्वर व अतिसारावर याच्या मुळांचा काढा देतात.

मंत्र-  ॐ  विघ्नराजाय नम:। विष्णूक्रान्त पत्रं समर्पयामि ।।


No comments:

Post a Comment