Sunday, September 20, 2015

२१ पत्री व त्यांचे औषधी गुणधर्म -बदरी पत्र, धत्तुर पत्र

बदर  पत्र ( Zizyphus jujube )
 




संस्कृत नाव- बदर 
मराठी नाव- बोर 
हिंदी नाव- बेर 
संपूर्ण भारतात तसेच यूरोप व ईस्ट एशिया मध्ये आढळणारे काटेरी क्षुप. याची फुले गुच्छात येतात. फळे मांसल छोटी लंबगोल व अतिशय मधुर असतात.

बोराची फळॆ पौष्टीक असून त्यात अनेक व्हीटामिन्स, मिनरल्स व ऍन्टी ओक्सिडंन्ट्स असतात. त्या मध्ये भरपुर प्रमाणात ए, बी, सी जीवनसत्व व प्रथिने असतात. तसेच त्यात कॅल्शियम, फोस्फरस व लोहाचे प्रमाणही त्यात पुष्कळ असते. या कारणाने कुपोषण व कृशते मध्ये वजन वाढवण्यासाठी फळांचा चांगला उपयोग होतो.

बोराच्या फळांच्या सेवनाने रोग प्रतिकारक शक्ति वाढण्यास तसेच शरीराचे बल वाढण्यास मदत होते.

बोराच्या फळांचा रस हृदयासाठी बल्य आहे.

शरीर दाह किंवा तापामुळे शरीराची आग होत असेल तर बोराच्या फळांचा रस घ्यावा. तसेच त्याच्या फळांचा रसाचा लेप लावावा.

आमवातावर बोराच्या पान व मुळाचा लेप लावल्यास वेदना कमी होतात.

बोराची बी उगाळून डोळ्यावर लेप केल्यास डोळ्याची आग कमी होते.

केस गळत असल्यास बोराची पाने व त्रिफळ्याचा लेप डोक्यावर लावावा.

पिंम्पल्स व उष्ण्तेने येणारया उबाळांवर बोराच्या पानांचा लेप लावतात.

मंत्र - ॐ लम्बोदराय नमः । बदरीपत्रं समर्पयामि ॥


धत्तुर  पत्र  (Datura metel)


संस्कृत नाव- धत्तुर, कनक , शिवप्रिय 
मराठी नाव- धोत्रा 
हिंदी नाव- धत्तुरा 

संपूर्ण भारतात उगवणारे ३ते ५ फूट उंचीचे क्षुप . फुले लांब श्वेत किंवा जांभळ्या रंगाची प्रायः २-३ एकत्र येतात. फळ गोलाकार काटेरी असते. 
आयुर्वेदोक्त औषधी उपयोग :

धोत्रा ही विषारी वनस्पती आहे. हिचा उपयोग तज्ञांच्या सल्ल्याने व त्यांच्या  देखरेखी खालीच  
करावा. 
आयुर्वेदातील अनेक औषधां मध्ये धोत्र्याचा वापर शुद्धीकरणा नंतर केला जातो. जसे कनकासव, त्रिभुवन किर्ति रस, सुतशेखर, महाविषगर्भ तेल
तसेच धोत्र्यापासून अनेक आधुनिक औषधांचे ही निर्माण केले जाते. जसे हायोसाइमिन, एट्रोपिन, स्कोपोलेमिन ईत्यादि.

आयुर्वेदाच्या मताप्रमाणे, धोत्रा कडू, तिखट रसाचा उष्ण गुणधर्माचा आहे.

धोत्रा वेदनास्थापक म्हणजे वेदना कमी करणारा व मादक आहे.
धत्तुर पानांचा किंवा मुळांचा लेप किंवा तेल ( महाविषगर्भ तेल) वेदना व सूजेवर वापरतात.

अम्लपित्तावरील प्रचलित औषध सूतशेखर रस यातही अल्प प्रमाणात धत्तुर बीज असते. डिओडीनल  अल्सर वरही सूतशेखर रसाचा उपयोग होतो.

धोत्र्यापासून तयार झालेले कनकासव दम्यावर उपयुक्त असते. त्याने श्वास वाहिन्या विकसित होतात.
याच्या पानांच्या धुराने ही दम कमी होतो.
मंत्र: ॐ  हरसूनवे  नमः | धत्तुर पत्रं समर्पयामि  ||

धोत्रा ही विषारी वनस्पती आहे. हिचा उपयोग तज्ञांच्या सल्ल्याने व त्यांच्या  देखरेखी खालीच  
करावा. 





No comments:

Post a Comment