Monday, September 21, 2015

२१ पत्री व त्यांचे औषधी गुणधर्म - तुलसी पत्र , करवीर पत्र


तुलसी पत्र ( Ocimum sanctum)


संस्कृत नाव- तुलसी, विष्णु प्रिया, भूतघ्नी
मराठी नाव- तुळस
हिंदी नाव- तुलसी
संपूर्ण भारतात आढळणारे शाखा-प्रशाखा युक्त क्षुप. 

आयुर्वेदानुसार तुळस तिखट, कडु व उष्ण आहे. 
तुळशीचे औषधी उपयोग व तिचे गुणधर्म व तिचा महिमा सर्व श्रुत आहे.
तरी थोडक्यात तिचे गुणधर्म पाहू-
तुळस कफवात शामक, जन्तुघ्न, वेदनाहर,  शोथहर, त्वचेच्या दोषांचे निवारण करणारी आहे. 
तुळस कास-श्वास हर(खोकला व दम कमी करणारी) व क्षयनाशक आहे. यासाठी तुळशीचा रस खडीसाखर घालून द्यावा.
सर्दीवर 7-8 तुळशीची पाने व 2/3 काळी मिरी घालून काढा करून प्यावा.लगेच बरे वाटते. 
तुळशीच्या रसाने किंवा तुळशीची पाने चावून खाल्ल्यास भूक वाढते, पचन सुधारते. 
तुळस कृमिघ्न आहे. तसेच ती विषघ्न ही आहे.
तुळशीच्या पानांचा रस हृदयासाठी हीतकर आहे.
तुळस रक्त शोधक आहे.
तुळशीच्या बिया बल वाढवणार्या, पित्त शामक व मुत्राचे प्रमाण वाढवणार्या आहेत.
अर्धशिशी व इतर शिरोवेदनेत तुळशीच्या रसाने नस्य करावे.
त्वचेच्या विकारांवर, तुळशीच्या पानांचा रस चोळून लावावा.
मंत्र - ॐ गजकर्णाय नमः। तुलसी पत्रं समर्पयामि ।।

 करवीर पत्र (Nerium indicum)



संस्कृत नाव- करवीर, अश्वमारक 
मराठी नाव- कण्हेर 
हिंदी नाव- कनेर 

प्रायः काश्मिर, नेपाळ सारख्या उंच डोंगराळ प्रदेशात आढळणारा सदाहरीत गुल्म.  पण हल्ली संपूर्ण भारतात आढळते  . फुले सुगंधित श्वेत किंवा लाल  रंगाची असतात. फळ लांब चपटी असतात.  त्यात अनेक भुऱ्या रंगाच्या बिया असतात. याचे श्वेत व रक्त असे २ प्रकार असतात.  
आयुर्वेदोक्त औषधी उपयोग :

कण्हेर ही  विषारी वनस्पती आहे. हिचा उपयोग तज्ञांच्या सल्ल्याने व त्यांच्या  देखरेखी खालीच  करावा. 
आयुर्वेदातील अनेक औषधां मध्ये कण्हेरीचा वापर शुद्धीकरणा नंतर केला जातो. जसे करवीराद्य तेल , करवीर  योग, महविषगर्भ तेल.  

कण्हेर कडू , तिखट, उष्ण वीर्याचे व कफ वात शामक आहे. 
वात विकारात व वेदनेत या  तेलाने मालिश करतात. 

अल्प मात्रेत कण्हेर हॄदयवर हृद्य ( हृदयाला बल देणारे ) आहे. पण अधिक मात्रेत हृदय अवसादक आहे म्हणून याचा वापर तज्ञांच्या देखरेखीखालीच करावा.
    

ॐ विकटाय नमः । करवीर पत्रं समर्पयामि ।।


Sunday, September 20, 2015

२१ पत्री व त्यांचे औषधी गुणधर्म -बदरी पत्र, धत्तुर पत्र

बदर  पत्र ( Zizyphus jujube )
 




संस्कृत नाव- बदर 
मराठी नाव- बोर 
हिंदी नाव- बेर 
संपूर्ण भारतात तसेच यूरोप व ईस्ट एशिया मध्ये आढळणारे काटेरी क्षुप. याची फुले गुच्छात येतात. फळे मांसल छोटी लंबगोल व अतिशय मधुर असतात.

बोराची फळॆ पौष्टीक असून त्यात अनेक व्हीटामिन्स, मिनरल्स व ऍन्टी ओक्सिडंन्ट्स असतात. त्या मध्ये भरपुर प्रमाणात ए, बी, सी जीवनसत्व व प्रथिने असतात. तसेच त्यात कॅल्शियम, फोस्फरस व लोहाचे प्रमाणही त्यात पुष्कळ असते. या कारणाने कुपोषण व कृशते मध्ये वजन वाढवण्यासाठी फळांचा चांगला उपयोग होतो.

बोराच्या फळांच्या सेवनाने रोग प्रतिकारक शक्ति वाढण्यास तसेच शरीराचे बल वाढण्यास मदत होते.

बोराच्या फळांचा रस हृदयासाठी बल्य आहे.

शरीर दाह किंवा तापामुळे शरीराची आग होत असेल तर बोराच्या फळांचा रस घ्यावा. तसेच त्याच्या फळांचा रसाचा लेप लावावा.

आमवातावर बोराच्या पान व मुळाचा लेप लावल्यास वेदना कमी होतात.

बोराची बी उगाळून डोळ्यावर लेप केल्यास डोळ्याची आग कमी होते.

केस गळत असल्यास बोराची पाने व त्रिफळ्याचा लेप डोक्यावर लावावा.

पिंम्पल्स व उष्ण्तेने येणारया उबाळांवर बोराच्या पानांचा लेप लावतात.

मंत्र - ॐ लम्बोदराय नमः । बदरीपत्रं समर्पयामि ॥


धत्तुर  पत्र  (Datura metel)


संस्कृत नाव- धत्तुर, कनक , शिवप्रिय 
मराठी नाव- धोत्रा 
हिंदी नाव- धत्तुरा 

संपूर्ण भारतात उगवणारे ३ते ५ फूट उंचीचे क्षुप . फुले लांब श्वेत किंवा जांभळ्या रंगाची प्रायः २-३ एकत्र येतात. फळ गोलाकार काटेरी असते. 
आयुर्वेदोक्त औषधी उपयोग :

धोत्रा ही विषारी वनस्पती आहे. हिचा उपयोग तज्ञांच्या सल्ल्याने व त्यांच्या  देखरेखी खालीच  
करावा. 
आयुर्वेदातील अनेक औषधां मध्ये धोत्र्याचा वापर शुद्धीकरणा नंतर केला जातो. जसे कनकासव, त्रिभुवन किर्ति रस, सुतशेखर, महाविषगर्भ तेल
तसेच धोत्र्यापासून अनेक आधुनिक औषधांचे ही निर्माण केले जाते. जसे हायोसाइमिन, एट्रोपिन, स्कोपोलेमिन ईत्यादि.

आयुर्वेदाच्या मताप्रमाणे, धोत्रा कडू, तिखट रसाचा उष्ण गुणधर्माचा आहे.

धोत्रा वेदनास्थापक म्हणजे वेदना कमी करणारा व मादक आहे.
धत्तुर पानांचा किंवा मुळांचा लेप किंवा तेल ( महाविषगर्भ तेल) वेदना व सूजेवर वापरतात.

अम्लपित्तावरील प्रचलित औषध सूतशेखर रस यातही अल्प प्रमाणात धत्तुर बीज असते. डिओडीनल  अल्सर वरही सूतशेखर रसाचा उपयोग होतो.

धोत्र्यापासून तयार झालेले कनकासव दम्यावर उपयुक्त असते. त्याने श्वास वाहिन्या विकसित होतात.
याच्या पानांच्या धुराने ही दम कमी होतो.
मंत्र: ॐ  हरसूनवे  नमः | धत्तुर पत्रं समर्पयामि  ||

धोत्रा ही विषारी वनस्पती आहे. हिचा उपयोग तज्ञांच्या सल्ल्याने व त्यांच्या  देखरेखी खालीच  
करावा. 





Saturday, September 19, 2015

२१ पत्री व त्यांचे औषधी गुणधर्म - बिल्व पत्र , दूर्वा पत्र




बिल्व पत्र ( Aegle marmelos )


संस्कृत नाव- बिल्व, शाण्डिल्य (पीडा दूर करणारा)
मराठी नाव- बेल 
हिंदी नाव- बेल

संपूर्ण भारतात प्रामुख्याने डोंगराळ प्रदेशात, हिमालयात आढळणारा २५-३० फूट उंचीचा वृक्ष.
याला हिरवट-पांढरी सुगंधी फुले येतात. फळे,  कठीण २. ५ - ३  इंच व्यासाची सुंदर धुरकट पिवळसर रंगाची असतात.   

आयुर्वेदोक्त औषधी उपयोग :
बेल   कषाय व  कडू रसाचे आणि  गुणधार्माने उष्ण  आहे. 
बेल विशेषतः वात-कफ  शामक आहे .
वातशमक असल्याने बेलाची पाने सूज व वेदना कमी करण्यास मदत करतात. वाताची वेदना कमी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या "दशमूळ" मधील बेल हे एक प्रमुख औषधी आहे. 
पचन  संस्थेच्या आजारांवर बेल फळाचा चांगला उपयोग होतो. 
१. कच्चे बेलफळ भूक वाढवणारे व पचन सुधारणारे आहे. ते ग्राही म्हणजे  अतिसार थांबवणारे व कृमिघ्न आहे . 
२. पिकलेले बेलफळ तुरट - गोड व मृदु रेचक आहे. 
३. बेलाच्या पानां च्या  रसाने यकृताचे कार्य सुधारून पित्ताचे विरेचन होते. 
४. खूप पिकलेल्या बेल फळाची मज्जा व खडीसाखर घेतल्यास  लगेचच  अतिसार व रक्तज अतिसार थांबतो. 
५. बेल, धणे , सुंठ व नागरमोथा चा काढा आमांशावर (अमिबिअसिस ) घ्यवा. 

बेलाच्या मुळाची साल व पानांचा रस हृदयासाठी बल्य व सूज कमी करणारे आहे 
याच्या पानांचा रस सर्दी, खोकला व दम्याच्या विकारात देतात. त्यामुळे कफ पातळ होऊन पडून जातो .  
बेलाच्या पानांच्या रसाने रक्तातली साखर कमी किवा यासाठी रोज बेलाची २ -३ दळे चावून खावीत . 
मूत्र प्रवृत्ती जास्त प्रमाणात होत असल्यास बेलफळ मज्जा ६ग्रॅम  व सुंठी ३ ग्रॅम चा काढा घ्यावा. 



मंत्र: ॐ  उमापुत्राय नमः | बिल्व पत्रं समर्पयामि  ||


 दूर्वा पत्र    (Cynodon dactylon)



संस्कृत नाव- दूर्वा , शतपर्वा 
मराठी नाव- दूर्वा  
हिंदी नाव- दूब 

संपूर्ण भारतभर होणारे, जमिनीवर पसरणारे बहुवर्षायू क्षुप .
याचे  १) श्वेत व  २) नील असे २ प्रकार असतात. त्या पैकी श्वेत दूर्वा औषधात वापरतात. 

आयुर्वेदोक्त औषधी उपयोग :
दूर्वा चवीला तुरट , गोड व गुणधार्माने शीत ( शरीरातील उष्णता कमी करणारे) द्रव्य आहे. याच कारणाने क्रोधिष्ट गणेशाला शांत करण्यासाठी त्याच्या मस्तकावर दूर्वा  वाहतात. 
उष्णतेमुळे नाकाचा घोणा फुटल्यास नाकात दुर्वांचा २-२ थेंब रस घालता किंवा खडीसाखर घालून दुर्वांचा रस पिण्यासा देतात .
तापामुळे जेव्हा  अंगाची खुप आग होते तेव्हाही दूर्वा स्वरस खडीसाखारेबर दिल्यास दाह कमी होतो व ताप उतरतो.
पित्तामुळे होणाऱ्या शिरोवेदनेत दुर्वा स्वरस नस्य केल्यास शिरोवेदना कमी होते
त्वचा विकारांवरही दूर्वा उपयोगी थ्रते.
दूर्वा मेध्य (बुद्धिवर्धक) व मनाला शांत करणारी आहे. बुद्धिदात्या गणेशाची ती सर्वात आवडती वनस्पती आहे यात नवल ते काय?
मंत्र: ॐ  गजाननाय नमः | दूर्वा  पत्रं समर्पयामि  ||

Friday, September 18, 2015

२१ पत्री व त्यांचे औषधी गुणधर्म - मालती पत्र , भृंगराज पत्र

मालती पत्र (Hiptage madablota)-



संस्कृत नाव- माधवी, भद्रलता  
मराठी नाव- मालती, मधुमालती, हळदवेल 
हिंदी नाव- माधवीलता 

प्रामुख्याने महाराष्ट्रात व  पश्चिम प्रायः  आर्द्र हवामानाच्या  ठिकाणी  आढळणारे किंवा  पावसाळ्यात उगवणारे क्षुप . थंडीत याला  फुले येतात. फुले सुंदर आकर्षक लाल व पांढ ऱ्या वर्णाची असून सुवासिक असतात.  
आयुर्वेदोक्त औषधी उपयोग :
मालती कडू, तिखट, मधुर व कषाय  रसाचे गुणधार्माने शीत आहे. 
मालती त्रिदोषघ्न विशेषतः पित्तशामक आहे . 
जुनाट चिवट खोकल्या मध्ये याचा उपयोग होतो . याच्या पानांच्या रस दम्याच्या विकारात देतात. त्यामुळे कफ पातळ होऊन पडून जातो .  
शरीराचा दाह   होणे  किंवा  पित्ताचे विकार कमी करणारे औषध . 
पानांचा रस सुजेवर लावल्यास सुज कमी होते. 
तसेच निरनिराळ्या त्वचा रोगांवर तसेच त्वचेचा वर्ण सुधारण्यासाठी उपयोगी. 



मंत्र: ॐ  सुमुखाय  नमः | मालती पत्रं समर्पयामि  ||


भृंगराज पत्र    (Eclipta alba )



संस्कृत नाव- भृंगराज 
मराठी नाव- माका 
हिंदी नाव- भांगरा

भारतात  प्रायः जलाशयाच्या  ठिकाणी  आढळणारे किंवा  पावसाळ्यात उगवणारे क्षुप .
फुलांवरून याचे  १) श्वेत २) पीत व ३) नील असे प्रकार असतात. 
आयुर्वेदोक्त औषधी उपयोग :
माका हे तिखट व कडू रसाचे गुणधार्माने उष्ण द्रव्य आहे. 
माका बल्य,  रसायन (वार्धक्य येण्याची गती मंदावणारे ), विषहर वनस्पती आहे. माका केश्य  म्हणजे केशवर्धक व केसांचा रंग व पोत सुधारणारे आहे. तसेच पाचनक्रिया सुधारून यकृताचे काम सुधारणारे आहे. माक्याच्या सेवनाने  पोटाचे व  पित्ताचे विकार कमी होतात. 
माका वातावरचे अत्यंत गुणकारी औषध आहे. माक्याचा रस काढून शरीराला चोळल्यास किंवा बाहेरुन सुजेवर लावल्यास सुज कमी होते. 
माक्याच्या रसाचे नस्य अर्धशिशी व इतर  प्रकारच्या  शिरोवेदनेवर उपयोगी  पडते. 
सर्वात महत्वाचे म्हणजे माका हे बुद्धिवर्धक आहे. १ ग्रॅम माक्याचे चूर्ण, खडीसाखर , तूप व  मध यासाठी नियमितपणे घ्यावे. 
असा हा माका बुद्धिवर्धक व इंद्रियांची शक्ती वाढवणारा असल्यामुळेच कदाचीत बुद्धीदात्या गणेशाला अर्पण करत असावेत. 


मंत्र: ॐ  गणाधिपाय नमः | भृंगराज  पत्रं समर्पयामि  ||

Thursday, September 17, 2015

WELCOME TO LORD GANESH !



Despite the fact that more than half of the population in India is living in poverty we Indians celebrate many festivals with lot of fanfare. 
We Indians have established our festive - loving image all over the world. People from other countries find it strange and blame Indians being insensitive.

But, personally I believe that festivals are necessary. Rich or poor, VIP and common man all celebrate festivals as per their capacities. Celebrating various festivals is a kind of recreation for Indians. Festivals bring in moments of happiness in distressed and dejected life of the common man.

These " CHOTI CHOTI KHUSHIYA" are necessary in life. DON'T YOU THINK SO ?

Apart from bringing happiness, celebration of every festival has some hidden scientific reasoning. Most of the festivals are celebrated considering environment, transitions in seasons and related health issues. The rituals performed during these festivals and offerings (different kinds of fruits, leaves and flowers etc.) used in these rituals give us some solutions or remedies to tackle health issues and bring us close to the nature.

Though in India festivals are celebrated through out the year but the main Festive season begins with "Shravan" which falls mostly in the month of "August -September".

In Maharashtra , the" MAHA _UTSAV - THE BIG FESTIVAL " of LORD GANESH which starts on "Bhadrapada Shuddha Chaturthi" is the crown of all festivals.

Idol of GANESH is worshiped devoutly every where and offerings of different fruits, flowers and leaves of 21 herbs are made to "Buddhidayaka" , "Aarogyadayaka" and "Vigha harta and Dukha harak" LORD GANESH. Now the million dollar question is that why these selected 21 leaves only are offered to GANESH ?

Ayurved offers the explanation.

Actually, the time of Ganesh festival is the time of cusp of the rainy season and the autumn. During this time our digestive fire is at stake. Many of us are tend to get diseases related to Kapha and Pitta.

Cough, cold, throat infection, fever, breathing problems, bronchitis, dengue , malaria, swine flu, diarrhea, hyper acidity , skin infections are some common ailments found during this season.

Ayurved defines "Dukha or sorrow "as diseased state of human being. So one who is Dukhaharta must have tools to alleviate (dukha) diseases. The offerings made to LORD GANESH of these 21 varieties of leaves of plants along with recitation of specific mantra, have great medicinal values and have lot of importance in treating various diseases.

During this season these leaves are available in plenty. Wouldn't it be wise to collect these medicinal herbs- leaves, store them and keep them handy which will help to fight against various ailments.


A list of 21 varieties of leaves and a specific mantra associated with them is given below-
१) ॐ  सुमुखाय नमः। मालती पत्रं समर्पयामि  ।।
२) ॐ गणाधिपाय नमः। भृंगराज पत्रं समर्पयामि ।।
३) ॐ उमापुत्राय नमः । बिल्व पत्रं समर्पयामि ।।
४) ॐ गजाननाय नमः । दूर्वा पत्रं समर्पयामि ।।
५) ॐ लम्बोदराय नमः । बदरी पत्रं समर्पयामि ।।
६) ॐ हरसूनवे नमः।धत्तूर पत्रं समर्पयामि ।।
७) ॐ गजकर्णाय नमः ।तुलसी पत्रं समर्पयामि ।।
८) ॐ विकटाय नमः ।करवीर पत्रं समर्पयामि ।।
९) ॐ वक्रतुण्डाय नमः । शमी पत्रं समर्पयामि ।।
१०) ॐ गुहाग्रजाय नमः।अपामार्ग पत्रं समर्पयामि ।।
११) ॐ एकदंताय नमः । बृहती पत्रं समर्पयामि ।।
१२) ॐ कपिलाय नमः । अर्क पत्रं समर्पयामि ।।
१३) ॐ गजदन्ताय नमः । अर्जुन पत्रं समर्पयामि ।।
१४) ॐविघ्नराजाय नमः।विष्णूक्रान्त पत्रं समर्पयामि
१५) ॐ बटवे नमः । दाडिम पत्रं समर्पयामि ।।
१६) ॐ सुराग्रण्याय नमः। देवदारू पत्रं समर्पयामि ।।
१७) ॐभालचंद्राय नमः । मरू पत्रं समर्पयामि ।।
१८) ॐ हेरम्बाय नमः । अश्वत्थ पत्रं समर्पयामि ।।
१९) ॐ चतुर्भूजाय नमः । जाती पत्रं समर्पयामि ।।
२०) ॐ विनायकाय नमः । केतकी पत्रं समर्पयामि ।।
२१) ॐ सर्वेश्वराय नमः । अगस्ती पत्रं समर्पयामि ।।

Thursday, September 3, 2015

Sunday, August 30, 2015

स्वागत गणरायाचे !!

स्वागत गणरायाचे !!

श्रावण महिना सरत आला की वेध लागतात ते सुखकर्त्या दुखहर्त्या गणरायाच्या आगमनाचे ! कुठलाही सण म्हणजे आनंद आणि गणेश चतुर्थी म्हणजे आनंदाला उधान!

आपल्या पुर्वजांनी कुठलाही सण केवळ मजा म्हणून साजरा केला नाही तर त्यामागे काहीतरी शास्त्रीय व वैद्यकिय कारण आहे.  बुद्धिकारक, विघ्नहारक, विद्येच्या देवतेच्या पूजे मध्ये दिली जाणारी अर्ध्य, पूजासामग्री व विशिष्ट  पत्री यामागे  काय कारण असावे हा प्रश्न तुम्हाला पडला  असेल. आयुर्वेदाच्या वनस्पती शास्त्रात (द्रव्यगूण  विज्ञान ) या प्रश्नाचे उत्तर सापडते. 

गणेश चतुर्थी भाद्रपद महीन्यात येते. हा ऋतु संधीचा काळ . पावसाळा (वर्षा ऋतु ) संपून शरद ऋतु सुरू होण्याच्या बेतात असतो.
आयुर्वेद शास्त्र सांगते की,  अशा वेळी  अग्नि मंद असतो, कफ पित्ताचे आजार जास्त बळावतात. सर्दी, खोकला, ब्रोंकायटिस ,साधा ताप, हिवताप आणि दम्याचे पेशंट घरोघरी दिसतात . जोडीला अतिसार, पोटाचे आजार, आम्लपित्त या सारखे आजार ही जोर धरतात.  
अगदी दर्शनासाठी कोणाच्या घरी गेलं तरी त्या घरातील  कोणी ना कोणी आजारी असल्याने ऐनवेळी पाहुण्यांच्या भूमिकेतून डोक्टरच्या भूमिकेत शिरावे लागते. 

अशावेळी  या आजारांच्या उपचारात आवश्यक असलेल्या औषधी वनस्पती संग्रही असणे असणे आरोग्याच्या दृष्टीने केव्हाही हितकरच!
गणेशाला मंत्रोच्चारणाबरोबर अर्पण केली जाणारी पत्री (२१ वनस्पतींची पाने) पाहिल्यास त्यातील प्रत्येक वनस्पतीम मध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. या ऋतुत होणाऱ्या आजारांवर त्या उपयुक्त आहेत . या शिवाय या सर्व वनस्पती या सिझन मध्ये भरपूर प्रमाणात उपलब्धही असतात . गणपतीच्या आगमनाबरोबर पुढील १० दिवस ह्या वनस्पतींचा संग्रह करणे आरोग्याच्या दृष्टीने नक्कीच उपयोगाचे ठरेल.

तर पाहूया गणेशाला कोणत्या मंत्रासोबत  कुठल्या कुठल्या २१ औषधी वनस्पतींच्या पत्री (पाने) वाहतात . 
१) ॐ  सुमुखाय नमः। मालती पत्रं समर्पयामि  ।।
२) ॐ गणाधिपाय नमः। भृंगराज पत्रं समर्पयामि ।।
३) ॐ उमापुत्राय नमः । बिल्व पत्रं समर्पयामि ।।
४) ॐ गजाननाय नमः । दूर्वा पत्रं समर्पयामि ।।
५) ॐ लम्बोदराय नमः । बदरी पत्रं समर्पयामि ।।
६) ॐ हरसूनवे नमः।धत्तूर पत्रं समर्पयामि ।।
७) ॐ गजकर्णाय नमः ।तुलसी पत्रं समर्पयामि ।।
८) ॐ विकटाय नमः ।करवीर पत्रं समर्पयामि ।।
९) ॐ वक्रतुण्डाय नमः । शमी पत्रं समर्पयामि ।।
१०) ॐ गुहाग्रजाय नमः।अपामार्ग पत्रं समर्पयामि ।।
११) ॐ एकदंताय नमः । बृहती पत्रं समर्पयामि ।।
१२) ॐ कपिलाय नमः । अर्क पत्रं समर्पयामि ।।
१३) ॐ गजदन्ताय नमः । अर्जुन पत्रं समर्पयामि ।।
१४) ॐविघ्नराजाय नमः।विष्णूक्रान्त पत्रं समर्पयामि
१५) ॐ बटवे नमः । दाडिम पत्रं समर्पयामि ।।
१६) ॐ सुराग्रण्याय नमः। देवदारू पत्रं समर्पयामि ।।
१७) ॐभालचंद्राय नमः । मरू पत्रं समर्पयामि ।।
१८) ॐ हेरम्बाय नमः । अश्वत्थ पत्रं समर्पयामि ।।
१९) ॐ चतुर्भूजाय नमः । जाती पत्रं समर्पयामि ।।
२०) ॐ विनायकाय नमः । केतकी पत्रं समर्पयामि ।।
२१) ॐ सर्वेश्वराय नमः । अगस्ती पत्रं समर्पयामि ।।

या वनस्पतींचे औषधी  गुणधर्म व उपयोग काय आहेत हे आपण येणाऱ्या १०दिवसांत जाणून घेऊ .