Saturday, March 28, 2020

देवाला काळजी!


मी दवाखान्यात दाखल व्हायचा अवकाश आणि आशा आपल्या नवऱ्याला घेऊन तडक आतमध्येच शिरली. आणि म्हणाली " यांना जरा आधी बघा ना डॉक्टर. "
तसं आल्या आल्याच कोणी कंसल्टींग मध्ये आलं कि कोणत्याही डॉक्टरच्या कपाळावर चार रेघा उमटतातच. पण स्वत:ला आवर घालत मी तिला आणि तिच्या नवऱ्याला बसायला सांगितलं.
" Sorry हो , मध्येच आली. पण मला मालकीणीने फक्त अर्ध्या तासाची सुट्टी दिली आहे. अर्ध्या तासात पुन्हा परत जायला पाहिजे नाहीतर ओरडा पडायचा" असं म्हणून फिदि फिदि हसली.
असंही आशा कधी ही आली कि मी फक्त ऐकायचं हे ठरलेलेच असतं. मला बोलण्याची संधी क्वचितच मिळते. " बरं , बोला. "
" दाखवा हो" तिने नवऱ्याला हुकुम सोडला. आणि पाठी running commentary चालू ठेवली.  तिच्या नवऱ्याने ही लगेच तिची आज्ञा मानली आणि examination table वर चढून लगेच हातापायांचे तळवे दाखवले. आणि माझे डोळे विस्फारले गेले. मी म्हंटलं " बापरे extensive palmo- plantar psoriasis". हो ना skin specialist पण हेच म्हणाले. आशाचं इंग्रजीचं  ज्ञान थोडं बरं होतं.  गेले दिड दोन वर्षं treatment चालू आहे. पण काही फायदा होत नाही. दरवेळी महागडी औषधं देतात. फी घेतात. पण बरं काही वाटत नाही. कंटाळा आला आहे अगदी!  बरं यांचं watchman चं काम. रोज नाईट ड्युटी घेतात आणि दिवसा गाड्या धुतात. तेवढाच हातभार संसाराला. हा असाच आजार घेऊन night ला जातात. त्यांना पायांनी उभं ही रहाता येत नाही कि हातांनी काही काम करता येत नाही.  साबण लागला की त्रास  वाढतो. कसं करायचं. दांडीही मारू शकत नाही. काय करायचं समजत नाही. आत्ता शेवटी तुमच्या कडे घेऊन आले. आत्ता तुम्हीच बघा काय ते. "
तिच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. कितीही चिंता असली तरी ती बाजूला ठेवून आनंदात कसं रहायचं हे आशा सारख्या हातावर पोट घेऊन जगणाऱ्यां कडूनच शिकावं. तिचं आशा हे नाव ती अगदी सार्थ करते. नाहीतर बरेचसे उच्च मध्यमवर्गीय रूग्ण असे बघितले आहेत की त्यांना अतिसुख बोचत असतं...

बऱ्याच वेळाने मला संधी मिळाल्यावर मी तोंड उघडून तिच्या नवऱ्याला गणेशला history विचारली.
Palmo-Plantar psoriasis हा एक अतिशय बरा करण्यास चिवट असा   व्याधी प्रतिकार क्षमता बिघडल्यामुळे होणारा  आजार ( auto-immune disorder) आहे. गणेश च्या हातापायांच्या तळव्यांची  परिस्थिती फारच खराब झाली होती.  तळव्यांना भेगा पडलेल्या होत्या. स्किन फाटली होती. प्रचंड आग होत होती. अधुन मधुन खाज ही होती.

पायावर उभं राहणं शक्य ही नसताना हा माणूस केवळ गरज म्हणून रोज चालत कामाला जात होता आणि रोज night करुन सकाळी त्याच हातांनी गाड्या धुतात होता. किती वेदना होत असतील ! कल्पना न केलेली बरी !!
बरं पथ्य अपथ्य सांगण्याचीही काही सोय नव्हती. कारण जे मिळेल ते काम करणाऱ्या आणि कमावून खाणाऱ्यांना काय पथ्य सांगायचे? आधी वात पित्त प्रकोपाचं कारण असणारी night shift त्याला आधी सोडावी लागली असती.

"खाण्यामध्ये काही पथ्य पाळत नाही पण व्यसन मात्र काही नाही. " इति आशा.
"बरं . व्यसन नाही ही चांगली गोष्ट आहे पण थोडं फार पथ्य मात्र पाळावेच लागेल माझं औषध घ्यायचं असेल तर." मी माझी अट सांगून टाकली.
" तुम्ही सांगा. ते प्रयत्न करतील. पण जमेलच असं काही सांगता येत नाही" आशाचा षटकार.
" अहो ठीक आहे. आंबट, खारट पदार्थ, लोणचं, पापड, आंबवलेले पदार्थ, मासे खाऊ नका. एवढं तरी जमेल ना? जेवणातलं मीठ कमी करा. शक्य तेवढी झोप पुरे होईल असं बघा." मी थोडी वैतागलेच होते. " औषधं देते. वेळेवर घ्या. बरेच दिवस घ्यावी लागतील. लगेच फरक पडणार नाही. कमीत कमी सहा महीने तरी." मी आधीच सांगून टाकले.
"हो , औषध घेतील ते. पण एक request आहे" आशाचा आवाज पहिल्यांदाच थोडा ओशाळला. "डॉक्टर पैशांची थोडी अडचण आहे. लगेच नाही देता येणार. जमेल तसे देईन." आशा थोडी उदास झाली. तिचे डोळे पाणावले.
"मी कुठे मागते तुमच्या कडे पैसे? सवड मिळेल तसे द्या. नाही दिलेत तरी चालेल. पण औषध थांबवु नका. चालू ठेवा. " तिने कृतज्ञतेने बघितलं, आणि ती म्हणाली," देवाला काळजी". तिच्या खांद्यावर मी थोपटलं आणि कंसल्टींग मधल्या धन्वंतरीच्या फोटो कडे बोट दाखवून म्हंटलं " होतील ते बरे. काळजी करू नका. "
धन्वंतरीचं नाव घेतले आणि आयुर्वेदिक औषधे दिली. काही गोळ्या ,काढे आणि औषधी तूप. पथ्य पुन्हा समजावून सांगितले.
नंतर जवळ जवळ आठ नऊ महिने त्यांची treatment चालू होती.
 त्यांना बरं वाटतं होतं. आणि आशा आणि गणेश अचानक गायब झाले. साधारण पणे दोन वर्षांनी ते पुन्हा आले. तोच अवतार. आजही ती पुढे आणि पाठीमागून नवरा येऊन गपगुमान उभा राहिला.
मधल्या काळात मला काहीच पत्ता नव्हता कि गणेशला कसं आहे. एखाद्या पेशंटला बरं वाटत असताना त्याने follow up सोडला कि डॉक्टर ला फार त्रास होतो.
त्या दोघांना पुन्हा बघितल्यावर मला भीती वाटली, पुन्हा तर palmo-plantar psoriasis नाही ना?
तेवढ्यात आशा पूर्वी सारख्याच आवेशात म्हणाली " पुर्वीचं काही नाही हो आत्ता !! आत्ता गुडघा दुखतोय त्यांचा उजवा.  गाडी पुसायला वर चढावं लागतं ना !.... " तिचंच निदान आणि....
मी हात जोडले आणि सुटकेचा निःश्वास टाकला. आणि खरंच देवाचे आभार मानले की फार पथ्य पाणी न करता palmo-plantar psoriasis औषधांनी बरा झाला होता. त्याने पुन्हा वर डोकं काढलं नव्हतं !

खरं आहे, म्हणतात ना .. देवाला काळजी!!


२८/०३/२०२०

Thursday, April 18, 2019

आत्मानुभव

आत्मानुभव

शाळेत जायला निघालो कि नेमका धोधो पाऊस लागायचा. 😍

मग डोक्यावर छत्रीचं  ओझं कशाला? असा विचार करून direct आभाळाशी आणि पावसाशी connect होण्यासाठी चिंबचिंब भिजायचो.

खळग्यात साठलेल्या पाण्यात मनसोक्त खेळायचो. एकमेकांवर साठलेल्या पाण्याचे तुषार उडवत आनंदात मस्त डुंबायचो.

पुन्हा तशाच भिजलेल्या अंगानी  शाळेत जाऊन बाकड्यावर बसायचो. कुर कुर वाजणाऱ्या पंख्याची हवा खात कधी अभ्यासात रमून जायचो ते समजायचेही नाही.

अभ्यास करताना ही डोळ्यासमोर तरळायचा तो अवखळ पाऊस आणि मन  भरून जायचं मातीच्या मंद मंद सुगंधाने. ☺

शाळेतून परत येताना पुन्हा भिजण्याचा आणि भिजवण्याचा कार्यक्रम असायचाच. 😊💃

एखादेवेळी पावसात चिंब भिजल्यावर शाळेला दांडी मारुन , भिजलेल्या अंगानींच, मैत्रीणीच्या घरी घेतलेल्या फेसाळलेल्या चहाची आणि गरम गरम शिऱ्याची मज़ा काही औरच असायची!! 😇😄

सर्व कसं बेभान आणि दिलखुलास!!

पण  कधी आजारी पडलो नाही कि कधी साधी शिंकही आली नाही किंवा कधी डॉक्टर कडे जावे लागले नाही.😃😃

उलट दुसऱ्या दिवशी ही पुन्हा त्याच उत्साहाने शाळेत जायला निघायचो. पुन्हा तोच पाऊस आणि तोच अनुभव चिंब भिजवणारा!!

कारण तेव्हा त्या कोसळणाऱ्या पावसात, एकमेकांना खट्याळ  पणे भिजवत , निसर्गाशी connect होण्याचा
 आत्मानुभव , मन आणि सर्व ज्ञानेंद्रियांबरोबर शरीराला ही टवटवीत ठेवायचा.अगदि वर्षभर .....
 पुढल्या पावसाळ्या पर्यंत !!

खरंच आहे ... मन , आत्मा व इंद्रिय प्रसन्न असतील तरच शरीरही सुदृढ व निरोगी रहाते, हो ना ? 😊Thursday, June 7, 2018

Healthy Life - Through Ayurveda!!

Healthy Life - Through Ayurveda!!

In today's times, people have become more health conscious.  The need for an integrated approach is felt intensively as we all are going through a tough time where in conventional system of medicine doesn't seem a convincing role in disease prevention. This is where, Ayurveda, an ancient indigenous science of life, comes in life. Recently, we are seeing a rising interest in Ayurveda. This is because Ayurveda primarily aims at physical as well as mental well being as against Allopathy, which is mainly disease centric and focuses on super specialist practise thereby hardly contributing to prevention of disease.

Prevention is most important aspect of medicine which has been neglected for so many years but recently it has come to a fore front and is being taken in to account in management of health.

For example, as part of the 2020 impact goals, the American Heart Association (AHA) has set out seven ideal health goals - non smoking, maintaining normal weight, increased physical activity, a healthy diet, normal blood lipid levels, normal blood pressure and a normal fasting glucose. An analysis of the US National Health and Nutritional Examination Survey (NHANES) showed, that individuals who met five of the seven ideal metrics of AHA, had a 78% reduction in the hazard ratio for all causes of mortality. These AHA's Life's Simple 7 metrics develop to measure and promote cardiovascular health and also predicts a lower risk of CKD.

Having a healthy lifestyle change just through healthy diet and exercise, metabolic diseases are reduced considerably. Traditional Medicine, which emphasizes these aspects in their practice plays a very important role. Therefore, the medical fraternity are now talking more about preventive guidelines and prevention of disease.

Fortunately we have inherited the legacy of ancient science of life, ‘’Ayurveda’’, based on a philosophy that good health comes from integrating all aspects of life such as lifestyle, food, conduct,  exercise and lastly medicines.

Every human being is born with a unique constitution which are broadly divided into three specific prototypes, based on "Tridosha". "Tridoshas" viz Vata, Pitta, Kapha. These Tridosha are  three basic driving forces present within our bodies in a specific combination  and perform their specific functions. This combination of doshas help define our physical, mental and emotional make-up that keeps our body in homeostasis and in turn  maintains healthy body state.

Ayurvedic approach primarily emphasizes prevention and maintenance of health स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम् आतुरस्य विकार प्रशमनम् च ||Next to prevention is treatment of disease.

In Swasthavritta, Ayurved advocates all the preventive principles which are necessary for maintaining health. Dinacharya, Ritucharya (the daily and seasonal regimens respectively) and Sadvritta are three essentials for healthy life in order to keep the Tridoshas in a state of healthy equlibrium and metabolism (agni) in proper order.

But these prevention strategies should be employed at the earliest stages of development so that these practices become a way of life. Rather it should be applied since the time of conception and during pregnancy to obtain healthy progeny. As per scientific data, 30% of the children born in India are of low birth weight. Chances of developing metabolic diseases is relatively high in these low birth weight children. But with adopting garbhdharan samskar and garbhini paricharya which mainly deals with maternal nutrition, help to improve nutritional status before conception and during pregnancy.

Even after taking proper care and despite adopting prevention strategies sometimes these three doshas go out of the balanced state, disease eventually occurs.

In Ayurveda,  an holistic approach is taken for the prevention and treatment of disease. The human body is considered as one unit when it comes to a treatment part. The Ayuvedic Physician evaluates a patient's health by determining his or her inherent  constitution and imbalanced state of Doshas causing ailments. Treatment is based on administrating a combination of herbs and managing diet, panchkarma, lifestyle changes etc. to bring the doshas and body back into homeaostasis and to alleviate the disease.

समदोषः समाग्निश्च समधातु मलःक्रियाः।
प्रसन्नात्मेन्द्रियमनः स्वस्थइतिअभिधीयते॥ (सुश्रुत संहिता सूत्रस्थान १५/१०)

Translated it means,
A person is healthy who’s  body, mind and soul are in normal state and all physiological actions are proper and in sync unlike the person who is physically healthy but mentally and spiritually not in proper state.

Thus, Ayurveda Practitioners are  rightfully forging ahead on the right path as shown by their Acharyas i.e. Teachers thus trying to achieve the state of overall well being and health of their patients.

Dr Sandhya Kadam
M.D. (Ayurved)
9967550282

Tuesday, April 10, 2018

Treating Polycystic Ovarian Syndrome with Ayurveda

Treating Polycystic Ovarian Syndrome with Ayurveda

Sejal was looking pretty excited as she entered my cabin. With a look of pure delight, she uttered “Hello Doctor! I came by to see you casually. You know what, Doc?! I feel so positive whenever I see you and that is the reason I turn up here.” I just smiled. "Love you doctor, Bye!!" Sejal said lovingly after some casual talk and moved out of my cabin. I just mumbled "cute girl" as she left and got back to my work.
But my mind wandered back to the day when Sejal turned up at my clinic for her treatment of PCOS (Polycystic Ovarian Syndrome). I was exactly two years ago this day. I still remember the day. Though she was looking beautiful, her increased weight was hampering her beauty. She was looking anxious and any one could make out of her depressed mood with her dull body language.
After taking her detailed history, I came to know that since her Menarche, she had problems with her menstrual cycles. She told me initially her menstrual cycles were excess blood flow which gradually converted into delayed cycles with bleeding for many days. Later on the situation became so bad that she had to resort to taking hormonal pills to induce her monthly cycles.
Irregular menstruation, weight gain, excess hair growth on her face and pimply face were her cause of worry and frustration. Add on to that was the stress due to family matters and studies, making her health problems even more severe.
After trying many treatment options, she had developed a strong belief that there was no permanent solution for her PCOS problem. She almost had given up and lost her hope that she would be slim like before and live her life like any other normal girl.
Truthfully, cause of her worry was not unjust and unfounded. PCOS is the most common endocrine abnormality in reproductive age women and in actual fact, a very frustrating condition for any female. Symptoms of PCOS could be any one or a combination of the following -
1) Absence of ovulation
2) Polycystic ovaries
3) Symptoms of excess androgen (male hormone)

The main feature attributing PCOS are -
1) Menstrual abnormalities / Irregular periods, the most common characteristic
2) Polycystic ovaries - Ovaries enlarged with multiple cysts in it cysts (small fluid filled pockets surrounding ovum or eggs)
3) Oligo- ovulation or anovulation i.e. releaing ovum (eggs ) irregularly or absence of ovulation
4) Hyper-androgenism - High levels of "male hormones" called androgens cause hirsutism (Excess growth of male pattern hair on face, chest, back and buttocks)
5) Insulin resistance - increased level of serum insulin which plays major role in increasing obesity especially central obesity
6) Skin thickening and discoloration commonly around neck, inner thighs and axilla
7) Thinning of hair and hair loss from head
8) Pimples and oily skin
9) Difficulty getting pregnant because of irregular ovulation or failure to ovulate
10) PCOS has also be known to be associated with an increased risk of developing health problems in later life such as type 2 diabetes and high cholesterol levels

The disorder accounts for 30% of all infertility cases with 73% of those suffering from PCOS experiencing infertility due to anovulation. Multiple factors are involved in the pathogenesis of PCOS. Some of them are-
1) Insulin resistance
2) Hormonal imbalance
3) Genetic factor
4) Stress and psychological factors
5) Sedentary life style, lack of exercise and dietary variations

Many a times, diagnosis and treatment of PCOS is based on clinical signs and symptoms and confirmed with the help of array of laboratory investigations and ultrasound.

PCOS’s complex pathological cascade makes treatment difficult and challenging. Even after prolonged treatments, problems persist and become more severe with increasing years.  Same was happening with Sejal. Sejal wanted some quick solution for her problem. Nothing was helping her to come out of the vicious cycle of stress-insulin resistance - PCOS- insulin resistance- obesity- PCOS. It really took a toll on me to explain her that there is no any quick solution for her problem. I explained to her that the treatment will bear fruit only if it is multifaceted and if it is addressed to tackling multiple problems at different levels.

I explained that there are 3 “Doshas” (Tridosha) i.e. Vata, Pitta & Kapha that govern activities like digestion, assimilation, metabolism in the human body at macro and micro level. I further explained that these Doshas are also instrumental in normal functioning of female reproductive system.

Vata esp. Apan Vayu (one among the 5 types of Vata) is responsible for movement of the follicles during ovarian cycle and releasing of the matured ovum and for its further movement in the tube & uterus. It also controls surge of different hormones at specific time during menstrual cycle so that hypothalamus-pituitary-ovarian axis is maintained & the menstruation at regular interval is preserved.

Pitta is responsible for transformation of hormones at different stages of Ovarian & menstrual cycle.
Kapha nourishes tissue development of reproductive system with its heavy and cool qualities and enhances follicular growth, mucosal growth of fallopian tube and uterus prevents from drying (Kashaya).

Any obstruction or abnormality in the function of these three “Doshas” leads to menstrual abnormalities.

I gave Sejal medicines to stimulate her basal metabolic rate and to correct the ovarian functions which she followed vigorously. Medicines included simple Herbal combinations like Trikatu, Kuberaksh Ghan Vati, Vachamustadi Kashayam etc. I also advised her to undergo Panchakarma treatment including Vaman, Virechan, Basti & Nasya which she followed religiously. The treatment mainly revolved around to detoxifying her body to bring Tridosha in physiologically balanced state.
Other than the Ayurvedic medicines & Panchakarma, I advised her to follow a strict regimen of diet, exercise and conduct. She started regular exercise. Counseling was the main stay treatment in her each of her visits which built her confidence in the treatment and gave her a ray of hope.
She decided to follow my instructions. She completely stopped sleeping after having lunch during day time. Regular yoga exercise and brisk walk brought in discipline in her life. Slowly her menstrual cycle regularized with the treatment. Gradually, she herself could feel the 180 degree shift in her personality from a depressed state to a happy & cheerful person that she once was. She could lose 10 percentile of her body weight with significant inch loss. As narrated by her mother she once again became positive, chirpy and lively. And of course, yes, till date she has never complained about her troublesome & erratic menstrual cycles.

Friday, March 2, 2018

बाबांची ठमाबाय

बाबांची ठमाबाय

"Riddh you made us feel proud", we love you from the Sun to Moon", "Yes you did it Riddhi". 
अभिनंदनाचा वर्षाव रिद्धी वर होत होता. ती सुद्धा तेवढ्याच प्रेमाने आणि अदबीने त्याचा स्विकार करत होती. सर्वांना भेटून जेव्हा ती तिच्या लाडक्या आईकडे (आजीला ती आईच म्हणते आणि आजोबा ना बाबा) आली तेव्हा आईला घट्ट मिठी मारून आईचे अश्रु पुसताना ती मोठ्या धीराने म्हणाली "आई रडू नकोस, बाबा आले होते माझा प्रोग्राम बघायला. मला ते दिसले, मी बघितलं त्यांना, ते तुझ्या जवळ बसले होते". आणि मग नंतर काही काळ दोघी ही एकमेकांना शांत करत होत्या. 
केवढी मोठी झाली बाबांची ठमाबाय! असं म्हणताना माझ्या डोळ्यांच्या कडा आपोआप पाणावल्या. 
रिद्धी, माझी भाची, सर्वांचीच आवडती. तिच्या लाडक्या श्वेता काकीच्या शब्दात सांगायचे तर गुणी माझं रिद्धु बाळ. पण तिचा सगळ्यात जास्त जीव होता तो तिच्या लाडक्या बाबांवर (आजोबावर).
शनिवार-रविवार ती जेव्हा आमच्या कडे यायची तेव्हा बाबांबरोबर गप्पा मारत बसायची. त्यांच्या काय गप्पा चालायच्या ते देवालाच माहिती. आमच्या बाबांवर कर्ण देत प्रसन्न असल्याने त्यांना सर्व गोष्टी लिहून द्याव्या लागत. मग बाबा बोलायचे आणि रिद्धी पाटी पेन्सिल घेऊन त्यांच्याशी संवाद साधायची.
आठ वर्षे मेहनतीने भारतनाट्यम शिकल्या नंतर जेव्हा रिद्धी ने आरंगेत्रम करायचे ठरवले तेव्हा बाबा एकदम खुप झाले. "आरंगेत्रम म्हणजे दीक्षा समारंभ. ठमाबाय एकदम मस्त परफाॅर्मन्स द्यायचा. छान डान्स करायचा हं! आणि आपण सर्वांना बोलवायचं तुझं आरंगेत्रम बघायला". वयाच्या 87व्या वर्षी ही त्यांच्यात कमालीचा उत्साह संचारला होता. कोणाकोणाला निमंत्रण द्यायचे याची लीस्ट दोघांनी बसून काढली. इथे बाबांनी फोन वरून आमंत्रणं द्यायला सुरुवात केली तर तिथे रिद्धी ची रोज नेटाने रिहर्सल चालू होती. आॅडीटोरीयमचे बुकींग, काॅस्चुम डीझायनिंग, इन्व्हीटेशन कार्ड सगळी जोरात तयारी सुरू होती.

आरंगेत्रमला 20 दिवसच राहिले होते आणि अचानकच बाबा गेले. त्यांच्या लाडक्या ठमाबायचा प्रोग्राम बघायचं बाकी ठेवून देवाघरी निघून गेले कायमचे.
"मी नाही करणार आरंगेत्रम. आत्ता मला ठमाबाय हाक कोण मारणार? मला नाही करायचा प्रोग्राम". रिद्धी ओक्साबोक्षी रडून सर्वांना सांगत होती. तिला समजवताना सर्वांना नाकी नऊ येत होते. शेवटी जवळ घेऊन आम्ही तिची समजूत काढली"रिद्धी आपण प्रोग्राम करायचा कारण आपले बाबा पण येणार तुझा प्रोग्राम बघायला. ते जिथे असतील तिथून तुला आशिर्वाद द्यायला नक्की येणार".

आत्ता आरंगेत्रम ला फक्त आठवडाच राहिला होता.रिद्धीने पुन्हा प्रॅक्टीस करायला सुरुवात केली. सगळे दिवस प्रॅक्टीस आंणि इतर तयारीतचा गेले. सलग 3 तास भरतनाट्यम् नृत्य करणे किती अवघड आहे हे ग्रॅन्ड रीहर्सल च्या वेळी आदल्या दिवशी लक्षात आले. आपल्या बरोबर इतर दोन नर्तकी बरोबर समन्वय साधून बेअरिग न सोडता सलग नृत्य करणे खरंच कठीण. आज कोणाचा ताळमेळ जमत नव्हता. दोन्ही नृत्य प्रशिक्षक संभ्रमात पडले  होते. आज ही परिस्थिती तर उद्या कसे होणार? पण ईच्छा शक्ती आणि थोरांचे आशिर्वाद पाठीशी असतील तर काही अशक्य नाही.

आणि शेवटी तो दिवस ऊजाडला. शो सुरू झाला तसं सुरुवाती पासून च मी फिंगर्स क्राॅस्ड ठेवली होती. देवाला प्रार्थना करत होते कि देवा सर्व व्यवस्थित पार पडू दे. आज 3 तास मुलींचा कस लागणार होता!

आणि रिद्धी ची एन्ट्री स्टेज वर झाली! तिचा स्टेज वरचा सहज वावर, तिचा मुद्राभिनय, तिचे नृत्य सर्वांचे मन जिंकून गेली. ती नृत्याविष्कार करताना एवढी सुंदर व आकर्षक दिसत होती कि तिचा परफाॅर्मन्स बघताना   आम्ही सर्व मायेने आणि आनंदाने भारावून गेलो. तिघीही मुलींनी छान समन्वय साधून एकाहून एक सुंदर नृत्य सादर केली. सलग 3 तास आम्हाला अद्वितीय स्वर्गानुभव प्राप्त करून दिला, जशा अप्सराच जणू तिथे अवतरल्या होत्या. डोळ्यांचे पारणे फिटले. मुलींची इतक्या वर्षांचे कष्ट, मेहनत, डेडीकेशन आणि आत्मविश्वास फळाला आला. बाबांना सांगितल्या प्रमाणे अतिशय सुंदर परफाॅरमन्स रिद्धी ने दिला होता. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी ऊभे राहून प्रचंड टाळ्याच्या कडकडात त्यांचे अभिनंदन केले, कौतुकाचा वर्षाव केला.

खरच असं वाटत होतं की खरोखरच स्वर्गातून देव आणि बाबा हा कौतुक सोहळा बघायला आले होते. बाबा त्यांच्या लाडक्या ठमाबायला भरभरून आशिर्वाद देत होते. रिद्धी म्हणाली ते खरे होते,  खरंच बाबा आले होते! मला ते दिसले!

रिद्धीची संध्यात्या

Thursday, January 19, 2017

कडु by default पण गुणकारी !


डॉक्टर, हा समीर बघा ना! तुम्ही दिलेला काढा बिलकूल घेत नाही. काढा पिताना फार कटकट करतो" माझ्या शाळेतल्या वर्ग मित्राची बायको लाडीकपणे त्याची तक्रार माझ्या कडे करत होती. "अग पण तो काढा रोज न चुकता घेतो असं म्हणाला मला".
ती उद्वेगाने म्हणाली " नाही हो . आत्ता तुम्ही च काय ते सांगा त्याला". असं म्हणून तिने फोन त्याच्या ताब्यात दिला. फोन हातात आल्या बरोबर समीर ने माझा पाणउताराच करायला सुरुवात केली . "अगं काय गं ते तुझं औषध  ! इतकं जार कडु औषध सकाळी सकाळी बायको माझ्या घशात ओतते. माझा अख्खा दिवस बेकार आणि कडु जातो".
मी मध्येच तोंड उघडण्याचा प्रयत्न केला. मी म्हंटले अरे पण " good medicine tastes bitter. "
त्याने लगेच उत्तर दिले " हो ना? Ok. Then you taste your own medicine first. त्यात तुझी पण चुक नाही म्हणा, कारण आयुर्वेदीक औषध॓ आणि आयुर्वेदिक डॉक्टर by default कडू असतात. "
एवढी प्रशंसा ऐकल्यावर मी पुढे तोंड उघडलं नाही.

आयुर्वेदाची प्रॅक्टीस करताना येणारा हा रोजचा अनुभव. बरेचसे पेशंट्स काढे घ्यायला फारच कंटाळा करतात. त्यांना औषधे देणे म्हणजे आम्हा वैद्यांच्या डोक्याला ताप असतो.
पण काही पेशंट्स मात्र फार गुणी असतात. अगदी आवर्जुन सांगतात ' सुरुवातीला थोडा त्रास झाला हो डॉक्टर काढा घेतांना पण आत्ता सवय झालीय."
काही पेशंट्स तर जार कडु औषध सुध्दा आवडीने आणि चवीने घेतात. माझा भाऊही त्यातलाच. त्याच्या म्हणण्या प्रमाणे त्याची taste आत्ता develop झालीय काढ्यासाठी.

खरं आहे, आयुर्वेदाची औषधं घेण्यासाठी कि नाही
taste develop  करावी लागते. निरनिराळ्या चवीची औषधे घेण्यासाठी जिभेला तशी सवय लावावी लागते.  जसं आपण थाई, कान्टीनेन्टल, चायनीझ  वगैरे फूड साठी टेस्ट डेव्हलप करतो ना अगदी तसंच! बरेच वेळा आपण अर्ध कच्चे, बेचव पदार्थ ही आवडले नसले तरी त्यांची तारीफ करून खातोच की..प्रेस्टीज म्हणून. अगदी चित्र विचित्र चायनिझ मांसाहारी पदार्थ सुध्दा! मग ते खाताना त्याचा स्वास्थ्यावर काय परिणाम होतो त्याचा ही आपण बिलकूल विचार करत नाही.

मग जी औषध थोडी कडु असतात पण आरोग्यासाठी हितकारक असतात ती घेताना चवीकडे लक्ष का द्यावे?
अगदी उदाहरणच द्यायचे झाले तर त्रिफळा,हळद,नीम, गुडुची असलेला पथ्यादि काढा म्हणजे डोकेदुखी वरचं एक रामबाण औषध. किंवा काडेकिराईत, गुडुची सारखी  जार कडु औषधं घालून तयार केलेला वासादशांग क्वाथ कितीही कडू असला तरी काविळी मध्ये अमृत तुल्य आहे. लगेच भूक वाढवतो. रास्नासप्तक काढा नुसताच कडु नाही पण वेगळाच लागतो. पण कितीतरी संधिवाताचे रुग्ण हा काढा घेऊन pain killer न घेता वेदना रहित उत्तम आयुष्य जगतात.
अशी गुणकारी आयुर्वेदिक औषधे घेतांना आपण एवढे आढेवेढे का घेतो?

औषध म्हणून घेतला तर मध ही कडु लागतो आणि जर चवी ने खाल्ले तर कारले ही  गोड लागते आणि कडू किराईतही  मधुर भासतो.
म्हणून फ्रेंड्स आपणही आपल्या आरोग्यासाठी,  हितकारक आणि आजारपणाला दूर ठेवणाऱ्या आयुर्वेदीक औषधासाठी टेस्ट डेव्हलप करून त्यांना जवळ नको करायला का?

लेखिका
By default कडु आयुर्वेदीक डाॅक्टर
"डॉ. संध्या कदम
एम् डी (आयुर्वेद)


हल्ली social media वर आयुर्वेदाच्या नावाखाली बऱ्याच पोस्ट्स,  मेसेजेस् ची देवाणघेवाण होत असते. एक आयुर्वेद तज्ञ म्हणून त्यातले बरेचसे विचार /मतं मनाला पटत नाहीत. पण प्रत्येक पोस्ट ला काॅमेंट देत बसण्या इतका वेळ आणि पेशन्स नसतो. पण कधी कधी आयुर्वेदाच्या नावाखाली काही ही चुकीच्या गोष्टी खपवल्या जातात तेव्हा मात्र मन खट्टू होतं.

Social media  वरून आपल्यावर निरनिराळ्या सूचनांचा भडीमार होत असतो. हे खा, ते प्या अमुक करा, तमुक करू नका, सकाळी उठल्यावर  1 लिटर पाणी प्या इत्यादी इत्यादी. अहो आयुर्वेदात पाणी किती आणि कुठल्या वेळेस प्यावे, कोणी जास्त पाणी प्यावे, कोणी जास्त पिऊ नये या बद्दल विस्तृत विवेचन केले आहे. .

परवाच वाचलं तुम्हाला healthy रहायचं असेल तर रोज अर्धा तास चाला, 20 मिनिटंच जाॅगिंग करा आणि कमीत कमी 15 ते 20 मिनिटंच धावा. आत्ता घ्या! पन्नाशीला आल्यावर संधीवातामुळे आधीच आपले सांधे कुरबुर करायला लागलेले असतात. चालणं ठीक आहे पण त1/2 तास चालण्याबरोबर,  20 मिनिटं जाॅगिंग आणि 20 मिनिट रोज धावलो तर गेले की आपले गुडघे कामातून! लवकरच  knee replacement च्या तयारीला लागावे लागेल हे निश्चित.

अशीच एक चुकीची सूचना  आयुर्वेदाच्या नावावर खपवली जाते ती म्हणजे म्हणजे वजन कमी करायचे असेल तर सकाळी रिकाम्या पोटी गरम पाण्यात मध घालून घ्या! हे चुकीचे आहे. पण एखादी चुकीची गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितली कि ती आपल्याला हळूहळू खरी वाटायला लागते. यालाच म्हणतात Gobbles technique !
आयुर्वेदाला गरम पाणी आणि मध हे combination  मान्य नाही. आयुर्वेदात सांगितले आहे "उष्णमुष्णारमुष्णे स युक्तम् चोष्मैर्निहन्ति तत्।" म्हणजे मध गरम करून खाणे, गरम पदार्थांबरोबर mix  करून खाणे किंवा गरम पाण्यावरोबर घेणे वर्ज्य आहे.
तुम्ही कधी मध गरम करून पाहिला आहे का? करून बघा. तो गोदासारखा होतो. त्याची चव बदलते, तो कडु होतो. आणि हा असा मध पचायला जड असतो व शरीरात आम (toxins)  निर्माण करतो.

एका  रिसर्च प्रमाणे  मध गरम केला किंवा गरम पाण्यातून घेतला तर त्यत negative physics-chemical reactions होतात आणि त्यात काही विषद्रव्ये (toxic substances)  तयार होतात जसे  त्यात HMF (hydromethyl furfuraldehyde) चे प्रमाण वाढते, pH वाढते,  त्याची consistency change होते, Browning वाढते, त्याची चव बदलते इत्यादी.
जर दररोज गरम पाण्यातून मध घेतल्यास  मधामधील होणारे physics-chemical changes शरीरासाठी हानीकारक (genotoxic, carcinogenic ) असतात. असेच परिणाम मध व तूप समप्रमाणात एकत्र केल्यासही होतो. म्हणून आयुर्वेदाने मध व तुपही समप्रमाणात घेऊ नये असं सांगितले आहे.

आयुर्वेदात सांगितलेले नियम प्रकृती सापेक्ष आणि व्याधी सापेक्ष सांगितलेले आहेत, random नाहीत.  म्हणूनच सोशल मिडीया वरील माहिती वर अवलंबून न राहता प्रत्यक्ष आयुर्वेद  तज्ञाकडे जाऊन च योग्य तो सल्ला घेतलेला बरा..

Dr Sandhya kadam
9967550282
drsandhyakadam1509@gmail.com