Thursday, January 19, 2017


हल्ली social media वर आयुर्वेदाच्या नावाखाली बऱ्याच पोस्ट्स,  मेसेजेस् ची देवाणघेवाण होत असते. एक आयुर्वेद तज्ञ म्हणून त्यातले बरेचसे विचार /मतं मनाला पटत नाहीत. पण प्रत्येक पोस्ट ला काॅमेंट देत बसण्या इतका वेळ आणि पेशन्स नसतो. पण कधी कधी आयुर्वेदाच्या नावाखाली काही ही चुकीच्या गोष्टी खपवल्या जातात तेव्हा मात्र मन खट्टू होतं.

Social media  वरून आपल्यावर निरनिराळ्या सूचनांचा भडीमार होत असतो. हे खा, ते प्या अमुक करा, तमुक करू नका, सकाळी उठल्यावर  1 लिटर पाणी प्या इत्यादी इत्यादी. अहो आयुर्वेदात पाणी किती आणि कुठल्या वेळेस प्यावे, कोणी जास्त पाणी प्यावे, कोणी जास्त पिऊ नये या बद्दल विस्तृत विवेचन केले आहे. .

परवाच वाचलं तुम्हाला healthy रहायचं असेल तर रोज अर्धा तास चाला, 20 मिनिटंच जाॅगिंग करा आणि कमीत कमी 15 ते 20 मिनिटंच धावा. आत्ता घ्या! पन्नाशीला आल्यावर संधीवातामुळे आधीच आपले सांधे कुरबुर करायला लागलेले असतात. चालणं ठीक आहे पण त1/2 तास चालण्याबरोबर,  20 मिनिटं जाॅगिंग आणि 20 मिनिट रोज धावलो तर गेले की आपले गुडघे कामातून! लवकरच  knee replacement च्या तयारीला लागावे लागेल हे निश्चित.

अशीच एक चुकीची सूचना  आयुर्वेदाच्या नावावर खपवली जाते ती म्हणजे म्हणजे वजन कमी करायचे असेल तर सकाळी रिकाम्या पोटी गरम पाण्यात मध घालून घ्या! हे चुकीचे आहे. पण एखादी चुकीची गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितली कि ती आपल्याला हळूहळू खरी वाटायला लागते. यालाच म्हणतात Gobbles technique !
आयुर्वेदाला गरम पाणी आणि मध हे combination  मान्य नाही. आयुर्वेदात सांगितले आहे "उष्णमुष्णारमुष्णे स युक्तम् चोष्मैर्निहन्ति तत्।" म्हणजे मध गरम करून खाणे, गरम पदार्थांबरोबर mix  करून खाणे किंवा गरम पाण्यावरोबर घेणे वर्ज्य आहे.
तुम्ही कधी मध गरम करून पाहिला आहे का? करून बघा. तो गोदासारखा होतो. त्याची चव बदलते, तो कडु होतो. आणि हा असा मध पचायला जड असतो व शरीरात आम (toxins)  निर्माण करतो.

एका  रिसर्च प्रमाणे  मध गरम केला किंवा गरम पाण्यातून घेतला तर त्यत negative physics-chemical reactions होतात आणि त्यात काही विषद्रव्ये (toxic substances)  तयार होतात जसे  त्यात HMF (hydromethyl furfuraldehyde) चे प्रमाण वाढते, pH वाढते,  त्याची consistency change होते, Browning वाढते, त्याची चव बदलते इत्यादी.
जर दररोज गरम पाण्यातून मध घेतल्यास  मधामधील होणारे physics-chemical changes शरीरासाठी हानीकारक (genotoxic, carcinogenic ) असतात. असेच परिणाम मध व तूप समप्रमाणात एकत्र केल्यासही होतो. म्हणून आयुर्वेदाने मध व तुपही समप्रमाणात घेऊ नये असं सांगितले आहे.

आयुर्वेदात सांगितलेले नियम प्रकृती सापेक्ष आणि व्याधी सापेक्ष सांगितलेले आहेत, random नाहीत.  म्हणूनच सोशल मिडीया वरील माहिती वर अवलंबून न राहता प्रत्यक्ष आयुर्वेद  तज्ञाकडे जाऊन च योग्य तो सल्ला घेतलेला बरा..

Dr Sandhya kadam
9967550282
drsandhyakadam1509@gmail.com

No comments:

Post a Comment