Thursday, January 19, 2017

कडु by default पण गुणकारी !


डॉक्टर, हा समीर बघा ना! तुम्ही दिलेला काढा बिलकूल घेत नाही. काढा पिताना फार कटकट करतो" माझ्या शाळेतल्या वर्ग मित्राची बायको लाडीकपणे त्याची तक्रार माझ्या कडे करत होती. "अग पण तो काढा रोज न चुकता घेतो असं म्हणाला मला".
ती उद्वेगाने म्हणाली " नाही हो . आत्ता तुम्ही च काय ते सांगा त्याला". असं म्हणून तिने फोन त्याच्या ताब्यात दिला. फोन हातात आल्या बरोबर समीर ने माझा पाणउताराच करायला सुरुवात केली . "अगं काय गं ते तुझं औषध  ! इतकं जार कडु औषध सकाळी सकाळी बायको माझ्या घशात ओतते. माझा अख्खा दिवस बेकार आणि कडु जातो".
मी मध्येच तोंड उघडण्याचा प्रयत्न केला. मी म्हंटले अरे पण " good medicine tastes bitter. "
त्याने लगेच उत्तर दिले " हो ना? Ok. Then you taste your own medicine first. त्यात तुझी पण चुक नाही म्हणा, कारण आयुर्वेदीक औषध॓ आणि आयुर्वेदिक डॉक्टर by default कडू असतात. "
एवढी प्रशंसा ऐकल्यावर मी पुढे तोंड उघडलं नाही.

आयुर्वेदाची प्रॅक्टीस करताना येणारा हा रोजचा अनुभव. बरेचसे पेशंट्स काढे घ्यायला फारच कंटाळा करतात. त्यांना औषधे देणे म्हणजे आम्हा वैद्यांच्या डोक्याला ताप असतो.
पण काही पेशंट्स मात्र फार गुणी असतात. अगदी आवर्जुन सांगतात ' सुरुवातीला थोडा त्रास झाला हो डॉक्टर काढा घेतांना पण आत्ता सवय झालीय."
काही पेशंट्स तर जार कडु औषध सुध्दा आवडीने आणि चवीने घेतात. माझा भाऊही त्यातलाच. त्याच्या म्हणण्या प्रमाणे त्याची taste आत्ता develop झालीय काढ्यासाठी.

खरं आहे, आयुर्वेदाची औषधं घेण्यासाठी कि नाही
taste develop  करावी लागते. निरनिराळ्या चवीची औषधे घेण्यासाठी जिभेला तशी सवय लावावी लागते.  जसं आपण थाई, कान्टीनेन्टल, चायनीझ  वगैरे फूड साठी टेस्ट डेव्हलप करतो ना अगदी तसंच! बरेच वेळा आपण अर्ध कच्चे, बेचव पदार्थ ही आवडले नसले तरी त्यांची तारीफ करून खातोच की..प्रेस्टीज म्हणून. अगदी चित्र विचित्र चायनिझ मांसाहारी पदार्थ सुध्दा! मग ते खाताना त्याचा स्वास्थ्यावर काय परिणाम होतो त्याचा ही आपण बिलकूल विचार करत नाही.

मग जी औषध थोडी कडु असतात पण आरोग्यासाठी हितकारक असतात ती घेताना चवीकडे लक्ष का द्यावे?
अगदी उदाहरणच द्यायचे झाले तर त्रिफळा,हळद,नीम, गुडुची असलेला पथ्यादि काढा म्हणजे डोकेदुखी वरचं एक रामबाण औषध. किंवा काडेकिराईत, गुडुची सारखी  जार कडु औषधं घालून तयार केलेला वासादशांग क्वाथ कितीही कडू असला तरी काविळी मध्ये अमृत तुल्य आहे. लगेच भूक वाढवतो. रास्नासप्तक काढा नुसताच कडु नाही पण वेगळाच लागतो. पण कितीतरी संधिवाताचे रुग्ण हा काढा घेऊन pain killer न घेता वेदना रहित उत्तम आयुष्य जगतात.
अशी गुणकारी आयुर्वेदिक औषधे घेतांना आपण एवढे आढेवेढे का घेतो?

औषध म्हणून घेतला तर मध ही कडु लागतो आणि जर चवी ने खाल्ले तर कारले ही  गोड लागते आणि कडू किराईतही  मधुर भासतो.
म्हणून फ्रेंड्स आपणही आपल्या आरोग्यासाठी,  हितकारक आणि आजारपणाला दूर ठेवणाऱ्या आयुर्वेदीक औषधासाठी टेस्ट डेव्हलप करून त्यांना जवळ नको करायला का?

लेखिका
By default कडु आयुर्वेदीक डाॅक्टर
"डॉ. संध्या कदम
एम् डी (आयुर्वेद)

1 comment:

  1. Top 100 Casinos Near Las Vegas by Area (Top 100 Apps
    Find top casinos near you near Las Vegas by 광주 출장샵 area (Top 천안 출장마사지 100 Apps for Casino Games 부천 출장샵 and Vegas 사천 출장샵 Slots) in the Google 전라북도 출장안마 Play Store.

    ReplyDelete