Thursday, April 18, 2019

आत्मानुभव

आत्मानुभव

शाळेत जायला निघालो कि नेमका धोधो पाऊस लागायचा. 😍

मग डोक्यावर छत्रीचं  ओझं कशाला? असा विचार करून direct आभाळाशी आणि पावसाशी connect होण्यासाठी चिंबचिंब भिजायचो.

खळग्यात साठलेल्या पाण्यात मनसोक्त खेळायचो. एकमेकांवर साठलेल्या पाण्याचे तुषार उडवत आनंदात मस्त डुंबायचो.

पुन्हा तशाच भिजलेल्या अंगानी  शाळेत जाऊन बाकड्यावर बसायचो. कुर कुर वाजणाऱ्या पंख्याची हवा खात कधी अभ्यासात रमून जायचो ते समजायचेही नाही.

अभ्यास करताना ही डोळ्यासमोर तरळायचा तो अवखळ पाऊस आणि मन  भरून जायचं मातीच्या मंद मंद सुगंधाने. ☺

शाळेतून परत येताना पुन्हा भिजण्याचा आणि भिजवण्याचा कार्यक्रम असायचाच. 😊💃

एखादेवेळी पावसात चिंब भिजल्यावर शाळेला दांडी मारुन , भिजलेल्या अंगानींच, मैत्रीणीच्या घरी घेतलेल्या फेसाळलेल्या चहाची आणि गरम गरम शिऱ्याची मज़ा काही औरच असायची!! 😇😄

सर्व कसं बेभान आणि दिलखुलास!!

पण  कधी आजारी पडलो नाही कि कधी साधी शिंकही आली नाही किंवा कधी डॉक्टर कडे जावे लागले नाही.😃😃

उलट दुसऱ्या दिवशी ही पुन्हा त्याच उत्साहाने शाळेत जायला निघायचो. पुन्हा तोच पाऊस आणि तोच अनुभव चिंब भिजवणारा!!

कारण तेव्हा त्या कोसळणाऱ्या पावसात, एकमेकांना खट्याळ  पणे भिजवत , निसर्गाशी connect होण्याचा
 आत्मानुभव , मन आणि सर्व ज्ञानेंद्रियांबरोबर शरीराला ही टवटवीत ठेवायचा.अगदि वर्षभर .....
 पुढल्या पावसाळ्या पर्यंत !!

खरंच आहे ... मन , आत्मा व इंद्रिय प्रसन्न असतील तरच शरीरही सुदृढ व निरोगी रहाते, हो ना ? 😊