स्वागत गणरायाचे !!
श्रावण महिना सरत आला की वेध लागतात ते सुखकर्त्या दुखहर्त्या गणरायाच्या आगमनाचे ! कुठलाही सण म्हणजे आनंद आणि गणेश चतुर्थी म्हणजे आनंदाला उधान!
आपल्या पुर्वजांनी कुठलाही सण केवळ मजा म्हणून साजरा केला नाही तर त्यामागे काहीतरी शास्त्रीय व वैद्यकिय कारण आहे. बुद्धिकारक, विघ्नहारक, विद्येच्या देवतेच्या पूजे मध्ये दिली जाणारी अर्ध्य, पूजासामग्री व विशिष्ट पत्री यामागे काय कारण असावे हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आयुर्वेदाच्या वनस्पती शास्त्रात (द्रव्यगूण विज्ञान ) या प्रश्नाचे उत्तर सापडते.

गणेश चतुर्थी भाद्रपद महीन्यात येते. हा ऋतु संधीचा काळ . पावसाळा (वर्षा ऋतु ) संपून शरद ऋतु सुरू होण्याच्या बेतात असतो.
आयुर्वेद शास्त्र सांगते की, अशा वेळी अग्नि मंद असतो, कफ पित्ताचे आजार जास्त बळावतात. सर्दी, खोकला, ब्रोंकायटिस ,साधा ताप, हिवताप आणि दम्याचे पेशंट घरोघरी दिसतात . जोडीला अतिसार, पोटाचे आजार, आम्लपित्त या सारखे आजार ही जोर धरतात.
अगदी दर्शनासाठी कोणाच्या घरी गेलं तरी त्या घरातील कोणी ना कोणी आजारी असल्याने ऐनवेळी पाहुण्यांच्या भूमिकेतून डोक्टरच्या भूमिकेत शिरावे लागते.
अशावेळी या आजारांच्या उपचारात आवश्यक असलेल्या औषधी वनस्पती संग्रही असणे असणे आरोग्याच्या दृष्टीने केव्हाही हितकरच!
अशावेळी या आजारांच्या उपचारात आवश्यक असलेल्या औषधी वनस्पती संग्रही असणे असणे आरोग्याच्या दृष्टीने केव्हाही हितकरच!
गणेशाला मंत्रोच्चारणाबरोबर अर्पण केली जाणारी पत्री (२१ वनस्पतींची पाने) पाहिल्यास त्यातील प्रत्येक वनस्पतीम मध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. या ऋतुत होणाऱ्या आजारांवर त्या उपयुक्त आहेत . या शिवाय या सर्व वनस्पती या सिझन मध्ये भरपूर प्रमाणात उपलब्धही असतात . गणपतीच्या आगमनाबरोबर पुढील १० दिवस ह्या वनस्पतींचा संग्रह करणे आरोग्याच्या दृष्टीने नक्कीच उपयोगाचे ठरेल.
तर पाहूया गणेशाला कोणत्या मंत्रासोबत कुठल्या कुठल्या २१ औषधी वनस्पतींच्या पत्री (पाने) वाहतात .
तर पाहूया गणेशाला कोणत्या मंत्रासोबत कुठल्या कुठल्या २१ औषधी वनस्पतींच्या पत्री (पाने) वाहतात .
१) ॐ सुमुखाय नमः। मालती पत्रं समर्पयामि ।।
२) ॐ गणाधिपाय नमः। भृंगराज पत्रं समर्पयामि ।।
२) ॐ गणाधिपाय नमः। भृंगराज पत्रं समर्पयामि ।।
३) ॐ उमापुत्राय नमः । बिल्व पत्रं समर्पयामि ।।
४) ॐ गजाननाय नमः । दूर्वा पत्रं समर्पयामि ।।
५) ॐ लम्बोदराय नमः । बदरी पत्रं समर्पयामि ।।
६) ॐ हरसूनवे नमः।धत्तूर पत्रं समर्पयामि ।।
७) ॐ गजकर्णाय नमः ।तुलसी पत्रं समर्पयामि ।।
८) ॐ विकटाय नमः ।करवीर पत्रं समर्पयामि ।।
९) ॐ वक्रतुण्डाय नमः । शमी पत्रं समर्पयामि ।।
१०) ॐ गुहाग्रजाय नमः।अपामार्ग पत्रं समर्पयामि ।।
११) ॐ एकदंताय नमः । बृहती पत्रं समर्पयामि ।।
१२) ॐ कपिलाय नमः । अर्क पत्रं समर्पयामि ।।
१३) ॐ गजदन्ताय नमः । अर्जुन पत्रं समर्पयामि ।।
१४) ॐविघ्नराजाय नमः।विष्णूक्रान्त पत्रं समर्पयामि
१५) ॐ बटवे नमः । दाडिम पत्रं समर्पयामि ।।
१६) ॐ सुराग्रण्याय नमः। देवदारू पत्रं समर्पयामि ।।
१७) ॐभालचंद्राय नमः । मरू पत्रं समर्पयामि ।।
१८) ॐ हेरम्बाय नमः । अश्वत्थ पत्रं समर्पयामि ।।
१९) ॐ चतुर्भूजाय नमः । जाती पत्रं समर्पयामि ।।
२०) ॐ विनायकाय नमः । केतकी पत्रं समर्पयामि ।।
२१) ॐ सर्वेश्वराय नमः । अगस्ती पत्रं समर्पयामि ।।
या वनस्पतींचे औषधी गुणधर्म व उपयोग काय आहेत हे आपण येणाऱ्या १०दिवसांत जाणून घेऊ .